पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत

शिवसेना

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे काँग्रेसमधून आणखी एका विद्यमान आमदाराने निवडणुकीआधीच काढता पाय घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. 

मला मोदीजींचा अभिमान: उद्धव ठाकरे

भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत दाखल होणार अशी चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून होती. त्यांना शिवसेनेत घेऊ नये. घेतले तरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, अशी मागणी स्थानिक शिवसैनिकांकडून केली जात होती. त्यासाठी स्वाक्षरी मोहिमही राबविण्यात आली होती. एवढे सगळे घडल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला.

पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघाच्या गणेशाचे मोदींनी घेतले दर्शन

उद्धव ठाकरे यांनी आपल्याला श्रीरामपूरमधून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले असल्याचे भाऊसाहेब कांबळे यांनी पत्रकारांना सांगितले. त्याचबरोबर काँग्रेसबद्दल माझ्या मनात राग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.