पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EVM वर आंदोलनाऐवजी विरोधक जनतेत गेले तर सहानुभूती मिळेल, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

देवेंद्र फडणवीस

ईव्हीएममध्ये फेरफाराचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा फेटाळून लावला. ईव्हीएमला दोष देण्याऐवजी विरोधकांनी आत्मचिंतन केले तर अधिक उत्तम होईल. अनेकवेळा सत्य स्वीकारण्याऐवजी मनाला समजविण्याचा प्रयत्न काही लोक करतात. ईव्हीएमवर दहा वर्षे त्यांनी राज्य केले आहे. केंद्रात, राज्यात, महापालिकांत, जिल्हा परिषदांमध्ये सगळीकडे राज्य केले. आता ईव्हीएमवर आंदोलन करण्याऐवजी ते जनतेत गेले, तर काही ना काही सहानुभूती त्यांना मिळेल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

राज्यातील सर्व विरोधी पक्ष ईव्हीएमच्या मुद्दयावर शुक्रवार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिले. फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आरंभ गुरुवारी अमरावतीमध्ये झाला. आज ही यात्रा वर्धामध्ये आली आहे. वर्ध्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मला मातोश्री आणि वर्षाहून फोन येताहेत, विजय वडेट्टीवार यांचा दावा

सध्या भाजपमध्ये सुरू असलेल्या भरतीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या पक्षात येण्यास खूप नेते इच्छुक आहे. पण आमच्याकडे लिमिटेड जागा आहेत. सगळ्यांना आम्ही घेऊ शकत नाही. अजून काही लोक निश्चितपणे येऊ शकतात. येणाऱ्या नेत्यांचे काम, त्यांची पार्श्वभूमी, स्वच्छ प्रतिमा हे सगळे बघूनच त्यांना पक्षात प्रवेश दिला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांमध्ये सध्या कोणीही राहायला तयार नाही. कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नये, यासाठी त्यांना शपथ दिली जाते आहे. पण शपथ दिल्यानंतरही ते राहतील की नाही, हे बघावे लागेल, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या शपथ कार्यक्रमाची खिल्ली उडविली.

काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीस तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार

विधानसभा निवडणूक आम्ही युतीनेच लढविणार आहोत, याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला. गेल्या निवडणुकीत आम्ही स्वतंत्रपणे लढलो होतो. त्यामुळे यावेळी जागा वाटपामध्ये काही अडचणी निश्चितपणे येतील. पण एकत्रित निवडणूक लढवायचे ठरविले तर दोन गोष्टी घ्याव्या लागतात आणि दोन गोष्टी सोडाव्याही लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 chief minister devendra fadnavis press conference in wardha denied allegations of evm manipulation