पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतने केली आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतने (२२ वर्ष) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रणवने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अकोल्यातील शास्त्री स्टेडियम जवळच्या क्रीडा प्रबोधनी येथे त्याने आत्महत्या केली आहे. प्रणव दररोज याच ठिकाणी सराव करायचा. प्रणवने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. 

राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका; सरपंच निवडीचा अध्यादेश फेटाळला

प्रणव क्रीडा प्रबोधनी येथे हॉस्टेलवर राहत होता. शुक्रवारी सकाळी प्रणव खोलीच्या बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला त्याला अनेकदा आवाज देऊन सुध्दा प्रणवने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला. तर प्रणवने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ताबडतोब याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच क्रीडा प्रमुखांनी आणि कर्माचाऱ्यांनी प्रणवच्या खोलीकडे धाव घेतली. 

मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर; मोदींसह 'या' दिग्गजांची घेणार भेट

प्रणवने आत्महत्या केल्याने क्रीडा प्रबोधनीत एकच खळबळ उडाली आहे. क्रीडा प्रमुखांनी याबाबत रामदास पेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. त्यांनी प्रणवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. प्रणवच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मात्र प्रणवने गुरुवारी नेहमीप्रमाणे सराव केला. तो कोणत्याही तणावात नव्हता अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे.  

सोलापूरात एसटी आणि जीपमध्ये भीषण अपघात; ४ जण ठार