पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Maharashtra Budget 2020: ठाकरे सरकारचा 'महा'घोषणांचा अर्थसंकल्प

उपमुख्यमंत्री अजित पवार (Photo-ANI)

शेरोशायरी, कविता म्हणत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. पहिल्याच अर्थसंकल्पात अजित पवार यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडला. शेतकरी, बेरोजगार, उद्योग, शहरी-ग्रामीण, पर्यटन, वैद्यकीय आदी क्षेत्रांसह समाजातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन दिसतो. अजित पवार यांनी केलेल्या काही घोषणा या जुन्याच होत्या. त्या घोषणांचा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात पुन्हा उल्लेख करण्यात आला. एकंदर या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येकाला काहीना काही देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, तिजोरीतील खडखडाट, कर्जाचा वाढता बोजा यासह विविध कारणांमुळे महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

राज्यात पेट्रोल, डिझेल एक रुपयाने महागणार

या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचा विचार करण्यात आला आहे. हे रयतेचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.  

सरकारने २ लाखांपर्यंतचे शेतकरी कर्जमाफी केली आहे. अर्थसंकल्पात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा दिला आहे. प्रति शेतकरी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे. त्याचबरोबर २ लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या खर्चातून मदत केली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आम्ही अटी नियमांशिवाय उभे करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. 

कोकणाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे अर्थमंत्री पवार यांनी म्हटले. कोकणात काजू प्रकल्पासाठी १५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. कोकणाच्या रस्त्यांचा विकास करण्यावर सरकारचा भर आहे. अति पावसामुळे कोकणातील रस्त्याची दुर्दशा होते. त्यामुळे तिथे काँक्रिट रस्ते केले जाणार आहेत. 

Maharashtra Budget 2020 : ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतःचे कार्यालय असेल आणि त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. अत्याधुनिक सुविधा असलेल्या वायफाय युक्त बस ग्रामीण भागासाठी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन सरकारने केले आहे. राज्यातील डॉक्टरांची कमतरता भरुन काढण्यासाठी सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागा वाढवून नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रयत्न आहे. 

सरकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला पोलिस ठाणे उभारणार

सरकारने शेतकऱ्यांना सुटसुटीत, हेलपाटे न घालायला लावणारी कर्जमाफी दिली, या योजनेत सर्व बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचे काम सुरू झाले आहे.

राज्यात ७५ नवीन डायलेसिस केंद्रे, आरोग्य सेवेकरिता ५००० कोटी

एसटीसाठी नव्या बसेस विकत घेण्यासाठी तसेच बस डेपो विकसित करण्यासाठी ४०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  जुन्या बस बदलून नव्या बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.