पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मराठा समाजातील ३५०० उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या, अन्यथा...'

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घेताना प्रविण दरेकर

मराठा समाजाच्या उमेदवारांना शासनाच्या अधिनियमातील कलम १८ नुसार नियुक्ती देण्यात यावी अन्यथा हा विषय विधीमंडळात मांडण्यात येईल. तरीही या प्रश्नाला सरकारने न्याय मिळवून दिला नाही तर विधीमंडळाच्या सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी गुरुवारी दिला.

बजाज ऑटोच्या कार्यकारी संचालक पदावरून राहुल बजाज पायउतार होणार

मराठा आरक्षण २०१८ अधिनियम ६२ क्रमांक १८ नुसार मराठा समाजाच्या उमेदवारांना नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज महाराष्ट्र पुरस्कृत धरणे आंदोलन गेले २ दिवस आझाद मैदान येथे सुरु आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गुरुवारी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. त्यांच्या समवेत आमदार राणा रणजितसिंह पाटील उपस्थित होते. याप्रसंगी दरेकर यांनी धरणे आंदोलनाला बसलेल्या उमेदवारांचा प्रश्न समजून घेतला. मराठा समाजाच्या सुमारे ३५०० उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. आमचे सरकारमध्ये मराठा आरक्षणच्या अधिनियमानुसार या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या पेचादरम्यान काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विषयामध्ये 'खो' घातला. तसेच हा विषय न्यायालयात योग्य पद्धतीने मांडला नाही, त्यामुळे या मराठा समाजाच्या या उमेदवारांवर अन्याय झाला असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

Australian Open : फेडररविरुद्ध विजयी चौकारासह जोकोविचनं गाठली फायनल

मराठा समाजाच्या या उमेदवारांना तातडीने नियुक्त करुन घेण्यात यावे. तसेच न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी व या उमेदवारांना न्याय मिळवून दयावा अन्यथा मराठा समाजाला पुन्हा एकदा आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागेल व त्यावेळी मराठा समाजाला अडवणे कठीण जाईल, असे सांगून हा विषय मार्गी लावण्यासाठी भाजप मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.