पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दानवेंनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला, खैरेंचा आरोप

रावसाहेब दानवे

शिवसेनेचे औरंगाबादमधील खासदार आणि लोकसभा निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. रावसाहेब दानवे यांनी युतीचा धर्म पाळला नाही आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात त्यांनी त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत.

शिवसेनेची मोदींवर स्तुतीसुमने तर काँग्रेसला फटकारले

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी रावसाहेब दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांना लागणारी सर्व मदत पुरविली होती. रावसाहेब दानवे यांच्या पत्नीने सर्वांना फोन करून हर्षवर्धन जाधव यांना मत देण्याचे आवाहन केले. जाधव यांचे निवडणूक चिन्ह ट्रॅक्टर होते. त्यांनी सर्वांना ट्रॅक्टरलाच मत देण्यास सांगितले, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. औरंगाबादमध्ये हिंदूंच्या मतांमध्ये फूट पाडण्यात रावसाहेब दानवेच कारणीभूत आहेत. त्यांनी युतीच्या धर्माचे पालन केलेले नाही, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. मी स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना फोन करून याबद्दल माहिती दिली होती. त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन जाधव यांना मत देऊ नका, असे सांगावे, अशी मागणी केल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बुरखा बंदीवर ओवेसी म्हणाले, शिवसेनेकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा ठेवाल

दरम्यान, भाजपचे राज्यातील प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी चंद्रकांत खैरे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपचे औरंगाबादमधील सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनी चंद्रकांत खैरे यांचाच प्रचार केला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना चंद्रकांत खैरे यांनाच निवडून आणण्याचे निर्देश दिले होते.

औरंगाबादमध्ये तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते. यावेळी तिथे चौरंगी लढत पाहायला मिळते आहे. यावेळी निवडणुकीत चंद्रकांत खैरे, हर्षवर्धन जाधव यांच्यासह काँग्रेसकडून सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडी, एमआयएमकडून आमदार इम्तियाज जलील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Raosaheb Danve backstabbed me worked for son in law in polls says chandrakant khaire