पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरपंचासारखं वागणाऱ्याला पंतप्रधान करणार का? आंबेडकरांची मोदींवर टीका

प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदींनी म्हणे संपूर्ण जगात देशाची प्रतिष्ठा वाढवली. ती वाढली असती, तर पाकिस्तान घाबरला असता. उलट पुलवामासारखी घटना घडली. त्यानंतर पाकमधील अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करून ३०० जण मारल्याचा मोदी दावा करतात. त्यापैकी एकतरी प्रेत दाखवा. देशाचा पंतप्रधान सरपंचासारखा वागला. अशालाच आपण परत पंतप्रधान करणार का? असा आंबेडकर यांनी केला. वंचित आघाडीचे उमेदवार संजय सुखधान यांच्या प्रचारार्थ कोपरगाव येथील सभेत ते बोलत होते. 

यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली. सोनिया व राहुल गांधी सध्या कारागृहात जाण्याच्या भीतीखाली वावरत आहेत. राहुल गांधींना अमेठी सोडून केरळमधून निवडणूक लढवावी लागते, यातून त्यांचा पळपुटेपणा दिसून येतो. कदाचित गांधी कुटुंबाने पळपुटेपणा बारामतीमधून शिकला असेल, अशी टोला आंबेडकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.