पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रकाश आंबेडकर म्हणतात, वंचित आघाडी सर्व जागा जिंकेल, पण..

प्रकाश आंबेडकर

एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी विरोधी पक्ष हे मानायला तयार नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. त्याचबरोवर वंचित आघाडी ४८ पैकी ४८ म्हणजे सर्व जागा जिंकू शकते. फक्त इव्हीएम हॅकिंगची शक्यता नाकारता येणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते. 

एक्झिट पोलनुसार 'ती' अन्य जागा कुणाकडे

यावेळी त्यांनी एनडीएला बहुमत मिळणे अशक्य असल्याचे म्हटले. एक्झिट पोलवर मला बोलायचे नाही. वंचित आघाडी सर्वच जागांवर निवडणूक जिंकू शकते. फक्त इव्हीएम हॅकिंगची शक्यता नाकारता येणार नाही, असे म्हणत त्यांनी इव्हीएमवर शंका उपस्थितीत केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हिमालय वारीवर भाष्य करताना ते म्हणाले की, हिमालयावर पोचणे अवघड नाही. तिथे टिकणे कठीण असते. ज्या वेगाने ते वर गेले तितक्याच वेगाने ते खाली येथील, असा टोला त्यांनी लगावला. 

वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीलाच फायदा: रामदास आठवले

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली होती. राज्यात वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही. सोलापुरातही भाजपचा उमेदवार येईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला होता. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग झाला तर त्याचे स्वागतच असेल, कारण त्यांच्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीच्या जास्त जागा निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला होता. प्रकाश आंबेडकरांना राजकीय कल समजून घेता आला नाही. खरे तर वंचित आघाडीला महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नाही, असे ते म्हणाले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Prakash Ambedkar says vanchit will win all 48 seats in maharashtra but express suspicion evm