पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EVM ठेवलेल्या ठिकाणी जॅमर लावा, काँग्रेसची मागणी

अशोक चव्हाण

मतदानाची नोंद झालेली मतदान यंत्रे EVM आणि व्हिव्हीपॅट मशीन VVPAT जिथे ठेवली आहेत. तिथे जॅमर लावण्यात यावेत. त्याचबरोबर मतमोजणी जिथे होणार आहे तिथेही जॅमर बसविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर कोणत्या मतदान यंत्रांमधील आणि व्हीव्हीपॅट मशिनमधील मतांची फेरजुळणी करायची, हे निवडण्याचा अधिकार संबंधित उमेदवाराला देण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

मोदीजी, तुमची कर्म तुमची वाट पाहताहेत; राहुल गांधींचे प्रत्युत्तर

महाराष्ट्रातील चार टप्प्यांतील मतदान २९ एप्रिल रोजी संपले. सध्या सर्व मतदान यंत्रे त्रिस्तरिय सुरक्षेमध्ये ठेवण्यात आली आहेत. येत्या २३ मे रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वखाली एका शिष्टमंडळाने अश्वनी कुमार यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात भाई जगताप, बाबा सिद्दीकी, नसीम खान  यांचा समावेश होता. अशोक चव्हाण म्हणाले, की मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून वायरलेस नेटवर्क वापरून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार केला जाऊ शकतो. त्यामुळे जिथे मतदान यंत्रे ठेवली आहेत. तिथे जॅमर लावले जावेत. त्याचबरोबर मतमोजणी जिथे होणार आहे. तिथेही जॅमर लावले जावेत, अशी मागणी त्यांनी केली. 

दरम्यान, आधुनिक तंत्रज्ञान वापरून ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसनेही म्हटले आहे. त्यामुळे जिथे ही मतदायंत्रे ठेवण्यात आली आहेत. तिथे कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तसे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवले आहे.

पार्थ यांच्यानंतर आता रोहित पवारही निवडणुकीच्या मैदानात उतरणार

दरम्यान, मतदान यंत्रांमध्ये कोणताही फेरफार केला जाऊ शकत नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. जर असे होऊ शकले असते तर ते आधीच झाले असते. पण आता असे होणे शक्य नाही. तरीही या संदर्भात जी मागणी करण्यात आली आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा हे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमारच ठरवतील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Jammers strict rules Maharashtra Congress lists ways to keep polls fair