पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EXCLUSIVE : मोदी सोडा, भाजपचा कोणताच नेता पुढचा पंतप्रधान होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजप १७० ते १७५ एवढ्याच जागा मिळवू शकेल. त्यामुळे त्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी सोडा, अन्य कोणताच नेता पुढचा पंतप्रधान होऊ शकणार नाही, असे भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. 'हिंदूस्थान टाइम्स'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकांवर सविस्तर भाष्य केले.

'विखेंनी राहुल गांधींच्या पाठीत खंजीर खुपसला'

ते म्हणाले, काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी UPA बाहेर असलेले कोणतेच पक्ष भाजपला पाठिंबा देणार नाहीत. बसपाच्या नेत्या मायावती असू दे की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे दोघेही मोदीविरोधी आहेत. त्यामुळे ते मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाहीत. याच्या अगदी विरुद्ध स्थिती काँग्रेससंदर्भात आहे. छोट्या पक्षांना एकत्र आणणे काँग्रेसला सहज शक्य आहे. त्यामुळे तो पर्यायही वापरला जाऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

फडणवीस सरकारवर टीका
पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील फडणवीस सरकारवरही जोरदार टीका केली. राज्यातील शेतीचे प्रश्न, दुष्काळ, बेरोजगारी यावरून त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर राज्यातील सध्याच्या सिंचनाच्या प्रकल्पांची माहिती देणारी श्वेतपत्रिकाच प्रसिद्ध करायला हवी, अशीही मागणी त्यांनी केली. गेल्या पाच वर्षांमध्ये सिंचनाच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली नाही. जर सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे सरकार करीत असेल, तर त्यांनी त्याची सद्यस्थिती आमच्यासमोर मांडली पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. पण सरकारकडे दुष्काळाचा सामना करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 BJP will be restricted to 170 175 seats says ex cm Prithviraj Chavan