पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती- धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने जबरदस्त यश मिळवले आहे. महाराष्ट्रात भाजपने २३, शिवसेनेने १८ या आपल्या जागा कायम राखल्या तर काँग्रेसला अवघी १ जागा मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही मागील वेळेप्रमाणेच आपल्या ४ जागा जिंकल्या. वंचित आघाडीने यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीची दमछाक करत औरंगाबादेतून एक जागा निवडून आणली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टि्वट केले आहे. कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, या कवितेच्या ओळी टि्वट करत त्यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले आहे. 

मोदींच्या शौर्याची दखल गिनीज बुकने घ्यावी, धनंजय मुंडेंचा टोला

मुंडे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो,
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो।

जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम,
संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम।

कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेला का सामोरे जात नाहीत, असा प्रश्न विरोधकांकडून गेली पाच वर्षे कायम विचारला जात असतानाच गत आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली होती. मात्र मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली नाहीत. यावरुन धनंजय मुंडे यांनी मोदींना टोला लगावला होता. मोदींचे याबद्दल अभिनंदन करत त्यांच्या या शौर्याची दखल गिनीज बुकने आवर्जून घ्यावी, अशी उपरोधिक मागणी त्यांनी केली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election result 2019 ncp leader dhananjay munde tweet inspirational poem after defeat