विदर्भातील भाजपचे विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरचा गड राखला आहे. त्यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांना पराभूत केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांचा तब्बल २ लाख ८० हजार मतांनी पराभव केला होता.
Maharashtra Lok Sabha Result Live Updates: नांदेडमधून अशोक चव्हाण पराभूत
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने स्थानिक नेत्यांच्या गटबाजीच्या राजकारणानंतर भंडाऱ्याचे नाना पटोले यांना गडकरींच्या विरुद्ध मैदानात उतरवले होते. नाना पटोले यांनी सर्व नेत्यांच्या गटांची तसेच सर्व समाज घटकांची मोट बांधून या लढतीत चुरस निर्माण केली होती. नागपूरच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बसपाचे मो. जमाल, वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे आणि बीआरएसपीचे सुरेश माने यांच्यासह ३० उमेदवार रिंगणात होते.
Lok Sabha Election Result 2019 : महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी
दुसरीकडे विदर्भातील रामटेकची अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव जागा शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी जिंकली आहे. त्यांनी काँग्रेसचे किशोर गजभिये यांना पराभूत केले. रामटेकमध्ये पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, आता या मतदार संघाची ओळख शिवसेनेचा गड अशी आहे.