पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

lok sabha election result 2019: मोदींसमोर कोणी टिकले नाहीतः संजय राऊत

संजय राऊत

भाजपला मिळालेला विजय हा निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आहे. लोकांनी विरोधकांना नाकारले आहे. विरोधकांनी उपस्थितीत केलेले प्रश्न मतदारांना रुचलेले नाहीत. मोदींसमोर कोणीही टिकू शकले नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. देशात आणि महाराष्ट्रात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने पहिली प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. 

lok sabha election result 2019: हा कौल आनंद देणारा तसेच झोप उडवणारा- मुख्यमंत्री

ते 'एबीपी माझा'शी बोलत होते. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने मतमोजणीच्या सुरुवातीला माध्यमांशी संवाद साधण्यास नेत्यांना मनाई केली होती. चित्र स्पष्ट झाल्यानंतरच शिवसेनेचे नेते माध्यमांसमोर आली. 

दरम्यान, नरेंद्र मोदींवर लोकांनी प्रचंड विश्वास दर्शवल्याबद्दल राऊत प्रथम आभार मानले. विरोधकांनी राफेल, बेरोजगारीसारखे विविध मुद्दे उपस्थितीत केले. पण ही प्रश्न टिकू शकली नाहीत. पुढील २५ वर्षे तरी मोदींना कोणी आव्हान देऊ शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विरोधकांनी उपस्थितीत केलेले प्रश्नं म्हणजे भुलभुलैय्या होता, असा टोलाही लगावला. तसेच मोदींच्या तुलनेत राहुल गांधी, प्रियांका गांधी असो किंवा अखिलेश हे काहीच नसल्याचे ते म्हणाले.

लोकसभा निवडणूक निकाल 2019: आम्ही कोणाचे गुलाम नाहीत-प्रकाश आंबेडकर