पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

lok sabha election result 2019: मोदी लाटेतही राखलेला गड यंदा ढासळला, अशोक चव्हाण पराभूत

अशोक चव्हाण

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही अशोक चव्हाण यांनी विजय मिळवून काँग्रेसची इभ्रत राखली होती. पण यंदा त्यांना आपला पराभव वाचवता आला नाही. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचा सुमारे ५० हजार मतांनी पराभव केला. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. खुद्द प्रदेशाध्यक्षांचा पराभव झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांनी सुमारे सव्वा लाखाहून अधिक मते मिळवली. वंचित फॅक्टर काँग्रेससाठी नुकसानकारक ठरल्याचे दिसत आहे. 

lok sabha election result 2019: हा कौल आनंद देणारा तसेच झोप उडवणारा- मुख्यमंत्री

यंदा काँग्रेस चांगली कामगिरी करेल असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला होता. पण त्यांनाच पराभव पत्करावा लागला. 

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना ४ लाख ९३ हजार ७५ मते मिळाली होती. त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी भाजपचे डी.बी. पाटील यांना ४ लाख ११ हजार ६२० मते मिळाली होती. अशोक चव्हाण हे ७१ हजार ४५५ मतांनी विजयी झाले होते.

lok sabha election result 2019: राजू शेट्टींचं चुकलं काय ?

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election result 2019 maharashtra congress state president ashok chavan defeat from pratap patil chikhalikar