पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

lok sabha election result 2019: माढाः प्रतिष्ठेच्या लढतीत पवारांवर मुख्यमंत्री वरचढ, निंबाळकर विजयी

रणजीत नाईक निंबाळकर

शरद पवार उभारणार.. नाही उभारणार..पुन्हा विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील उभारणार..त्यांचा नकार..मग रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश..इतक्या दिवस भाजपच्या गोटात असलेले संजय शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश..त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी आणि अत्यंत काथ्याकूट करुन ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून आलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपची उमेदवारी. अत्यंत नाट्यमय घडामोडी घडलेल्या माढा मतदारसंघात अखेर बाजी मारली ती भाजपच्या निंबाळकर यांनी. ही निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाजी मारली. निंबाळकर यांनी शिंदे यांचा पराभव केला. 

lok sabha election result 2019: हा कौल आनंद देणारा तसेच झोप उडवणारा- मुख्यमंत्री

अत्यंत चुरशीची ठरलेल्या या निवडणुकीत निंबाळकर हे शिंदेंना भारी पडले. या मतदारसंघाची जबाबदारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर शिंदे यांची जबाबदारी ही खुद्द शरद पवार यांच्याकडे होती. इतक्या दिवस एकत्र फिरणारे महसूल मंत्री पाटील आणि संजय शिंदे यांनी प्रचारावेळी एकमेकांनी बघून घेण्याची भाषा वापरली होती. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांना निवडून आणण्याचा चंगच बांधला होता. 

लोकसभा निवडणूक निकाल 2019: आम्ही कोणाचे गुलाम नाहीत-प्रकाश आंबेडकर