पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Maharashtra Lok Sabha Result Updates: उत्तर मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन यांचा विजय

महाराष्ट्रात भाजप आघाडीवर आहे. (छायाचित्रः विजयानंद गुप्ता, मुंबई)

एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला अधिक जागा मिळवल्या आहेत. भाजप २३ तर शिवसेनेने १८ जागांवर आघाडी घेतली आहे. यापैकी काही ठिकाणी त्यांना विजयही मिळाला आहे. प्राथमिक दृष्ट्या वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेलाच मोठा फटका बसल्याचे दिसते.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे या दिग्गजांचा पराभव झाला आहे.

मागील बलाबल 
भाजप- २३, शिवसेना- १८, राष्ट्रवादी काँग्रेस- ४, काँग्रेस- २, स्वाभिमानी शेतकरी संघटना- १. 


UPDATES: 

- अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे विजयी

- उत्तर मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन यांचा विजय

- उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी

- शिर्डीतून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी

- नांदेडमधून अशोक चव्हाण ५० हजार मतांनी पराभूत

- अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव

- शिरुर मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव, अमोल कोल्हे विजयी

- हा कौल आनंद देणारा तसेच झोप उडवणारा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीते यांचा पराभव, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी २१ हजार  मतांनी केला पराभव.

- बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे १५ व्या फेरीत ९५०६२ हजार मतांनी आघाडीवर

- मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे १ लाख ९० हजार मतांनी आघाडीवर 

- भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांच्याविरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त ७६,३७८ मतांनी मागे. 

- पालघरमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावीत ३९,६५० मतांनी आघाडीवर

- सांगलीतून विशाल पाटील पिछाडीवर

- चंद्रपूरमध्ये भाजपचे हंसराज अहिर १३०० मतांनी पिछाडीवर

-  उत्तर मुंबईः भाजपचे गोपाळ शेट्टी यांना 1,42,143. काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर 47,876. गोपाळ शेट्टी यांनी 94,267 मतांनी पुढे

- भिवंडी लोकसभाः कपिल पाटील -भाजपा 74,568. सुरेश टावरे- काँग्रेस 56, 310. अरुण सावंत - वंचित 7561. भाजपाला 18,258ची आघाडी.

- उस्मानाबादः शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर सहाव्या फेरीअखेर 29,637 मतांनी आघाडीवर. ओमराजे निंबाळकर यांना 1,43, 967 मतं तर राणा जगजितसिंह पाटील यांना 1,14, 320 मतं मिळाली.

- नांदेडमध्ये वंचित आघाडीला ४४ हजार मतं

- अशोक चव्हाण २१ हजार मतांनी मागे.

- लातूर लोकसभाः सुधाकर शृंगारे, भाजप - 40212, मच्छिंद्र कामत, काँग्रेस- 16493, राम गारकर, वंचित आघाडी- 5574

- सोलापूरः भाजप शिवाचार्य महाराज 64493, काँग्रेस सुशीलकुमार शिंदे 47886, वंचित प्रकाश आंबेडकर 18993 मते. भाजप 16607 मतांनी आघाडीवर. 

- माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे २५०० मतांनी पुढे.

- मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना सुमारे ५४ हजार मतांची आघाडी. पार्थ पवार पिछाडीवर

- सोलापूरः भाजप 52513, काँग्रेस 39793, वंचित आघाडी 15637. भाजप 12,720 मतांनी आघाडीवर

- राज्यात शिवसेना १९ जागांवर आघाडी, मुंबईतील सर्व ६ जागांवर शिवसेना आघाडीवर

-  अहमदनगरमध्ये सुजय विखे-पाटील यांना ६५८३३, राष्ट्रवादीचे संग्राम जगताप- ३९९०३ मते.  सुजय विखे २५१३० मतांनी पुढे

- भाजपच्या पूनम महाजन आघाडीवर

- मुंबई- भाजपचे मनोज कोटक ११ हजार मतांनी पुढे

- मुंबई- शिवसेनेचे गजानन किर्तीकर १६ हजार मतांनी आघाडीवर

- कोल्हापूरमधून शिवसेनेचे संजय मंडलिक ६० हजार मतांनी आघाडीवर

- बुलढाणा चौथी फेरी- शिवसेना प्रतापराव जाधव- 32563, राष्ट्रवादी डॉ. शिंगणे 23250. 9313 मतांनी शिवसेना पुढे

- यवतमाळमध्ये काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना १४, ७४७, सेनेच्या भावना गवळी यांना १७,७७८ मते. शिवसेना आघाडीवर

- बीडमधून भाजपच्या प्रीतम मुंडे चौथ्या फेरीअखेर २८००० मतांनी आघाडीवर 

- कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे १५,१६५ मतांनी आघाडीवर....

- गिरीश बापट पुण्यातून २४१८० मतांनी आघाडीवर

- ठाण्यातून शिवसेनेचे राजन विचारे पुढे

- चंद्रपूरमधून केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आघाडीवर

- दिंडोरीतून भाजपच्या भारती पाटील आघाडीवर

- जळगावात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर पिछाडीवर

- नंदूरबारमधून के सी पडवी आघाडीवर

- नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गो़डसे आघाडीवर

- रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर

- माढ्यातून राष्ट्रवादीचे संजय शिंदे पुन्हा आघाडीवर

- बारामतीमधून सु्प्रिया सुळे ६ हजार मतांनी आघाडीवर

- साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उदयनराजे आघाडीवर

- भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील आघाडीवर

पहिली फेरी- सोलापूर भाजप 23511, काँग्रेस 18802, वंचित 7725

- धुळ्यात भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर

- महाराष्ट्रात भाजप २४, शिवसेना ११, काँग्रेस ४, राष्ट्रवादी ९ तर वंचित आघाडी १ जागेवर आघाडीवर

- अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आघाडीवर

- नागपूरमध्ये नितीन गडकरी आघाडीवर

- गडचिरोलीतून भाजपचे अशोक नेते आघाडीवर

- रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने आघाडीकडे

- कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आघाडीवर

- दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा पिछाडीवर

- बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंढे २२ हजार मतांनी आघाडीवर

- माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे १२ हजार मतांनी पिछाडीवर

- उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आघाडीवर

- बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे ८ हजार मतांनी पिछाडीवर तर मावळमध्येही पार्थ पवारही मागे

- माढ्यातून भाजपचे निंबाळकर आघाडीवर

- औरंगाबादमधून सेनेचे चंद्रकांत खैरे पिछाडीवर

- सांगलीतून स्वाभिमानीचे विशाल पाटील आघाडीवर

- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना मतदारसंघातून आघाडीवर

- औरंगाबादमध्ये 'वंचित'चे इम्तियाज जलील आघाडीवर

- रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आघाडीवर

- पुण्यातून गिरीश बापट आघाडीवर

- मावळमध्ये पार्थ पवार आघाडीवर

- शिरुरमधून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आघाडीवर

- मुंबईतल्या सर्व ६ जागांवर युती आघाडीवर

- राज्यात भाजप २०, शिवसेना ११, काँग्रेस ८ आणि राष्ट्रवादी ८ जागांवर आघाडीवर

- औरंगाबादेत शिवसेनेचे चंद्रकांत आघाडीवर

- शिरुरमधून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आघाडीवर

- माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संजय शिंदे आघाडीवर

- सोलापूरमधून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आघाडीवर

- हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी पिछाडीवर

- नागपुरात काँग्रेसचा इव्हीएमला आक्षेप

- रत्नागिरी-सिंधूदुर्ग येथे शिवसेनेचे विनायक राऊत आघाडीवर

- नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आघाडीवर

- कोल्हापुरात शिवसेनेचे संजय मंडलिक आघाडीवर

- भाजप ७, शिवसेना २ आणि काँग्रेस २ जागांवर आघाडी

- कोल्हापुरात शिवसेना आघाडीवर, राष्ट्रवादी मागे

-  पोस्टल मतमोजणीनुसार राज्यात भाजप ३ जागांवर तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर

- पोस्टल मतमोजणीनुसार महाराष्ट्रात सुुरुवातीला ३ ठिकाणी भाजप आघाडीवर

- पोस्टल मतमोजणीस सुरुवात

- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नगरचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांचा माध्यमांशी बोलताना विजयाचा दावा

- प्रारंभी पोस्टल मतदानाची मतमोजणी होईल

- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

- राज्यातील उमेदवारांचे मतमोजणीपूर्वी 'टेम्पल रन'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election result 2019 live updates for maharashtra 48 constituencies party wise result