पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभा निवडणूक निकाल 2019: आम्ही कोणाचे गुलाम नाहीत-प्रकाश आंबेडकर

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचा अपेक्षाभंग झाल्याचे सुरुवातीच्या कलानुसार दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा फटका दिसत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस-वंचित बहुजनची आघाडी झाली असती तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते असे बोलले जात आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र याचे खापर काँग्रेसवरच फोडले आहे. आम्ही कोणाचे गुलाम नाहीत. यात काँग्रेसचा दोष आहे. आम्ही त्यांच्याकडे हात पुढे केला होता, अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.

Lok Sabha Election Result 2019 : मावळमधून पार्थ पवार पिछाडीवर, राष्ट्रवादीला धक्का

वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो असा सवाल केल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले. 

प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापूर आणि अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे सोलापूर, नांदेड, बुलढाणा, उस्मानाबाद, माढा, अमरावती, हातकणंगले या मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संकटात आले आहेत. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील आदी दिग्गजांचा समावेश आहे.

ऐतिहासिक उसळी ! सेन्सेक्सचे अब की बार ४० हजार पार