पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

lok sabha election result 2019: राजू शेट्टींचा पराभव, नेमकं काय चुकलं ?

राजू शेट्टी

ऊसाला दर मिळालाच पाहिजे, दूध दरवाढ झालीच पाहिजे, पिकांना हमीभाव मिळालाच पाहिजे, याभोवतीच मागील अनेक वर्षे चळवळ उभारणारे राजू शेट्टी. हातकणंगलेतील शेतकरी मतदारांनी त्यांना सलग दोन वेळा निवडून दिले. पहिली टर्म आघाडीच्या पाठिंब्याने तर दुसरी टर्म युतीच्या सहकार्याने विजयी झालेले राजू शेट्टी यंदा पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात सामील झाले. पण मतदारांना हे रुचलेले दिसत नाही. कारण यावेळी मतदारांनी शिवसेनेचे युवा उमेदवार धैर्यशील माने यांच्या बाजूने कौल दिला आहे. राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव असलेले धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींच्या हॅटट्रिकवर पाणी फेरण्याचे काम केले आहे. 

Lok Sabha Election Result 2019 : नगरमधून सुजय विखे-पाटील आघाडीवर, भाजप जागा राखण्याच्या दिशेने

शेतकऱ्यांसाठी लढणारा आक्रमक नेता अशी ख्याती असलेले राजू शेट्टी यंदा मागे का पडले हा प्रश्न सर्वांना पडला आहे. एकीकडे उमेदवारांना निवडणुकीसाठी लाखो-कोटी रुपये खर्च करावे लागतात. तर दुसरीकडे जनतेने दिलेल्या निधीवरच शेट्टी यांनी आतापर्यंतच्या निवडणुका लढवल्या आहेत. पूर्वीच्या सहकाऱ्यांनी सोडलेली साथ, त्यातच सत्ताधाऱ्यांशी घेतलेला पंगा आणि महत्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीने उभा केलेला उमेदवार. वंचितने येथून असलम बादशाहजी सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही भरपूर मते घेतली आहेत. कदाचित याचाच फटका राजू शेट्टींना बसल्याची शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर ब्राह्मण समाजाबद्दल केलेले वक्तव्यही त्यांना भोवल्याचे दिसत आहे. 

शिवसेनेत नवखे असले तरी घरातूनच राजकरणाचे बाळकडू मिळालेले धैर्यशील माने यांनी मतदारांवर प्रभाव पाडल्याचे चित्र दिसते. त्यात पुन्हा मोदी फॅक्टरही त्यांच्या मदतीला आला आहे. हातकणंगले मतदारसंघाची आकडेवारी पाहिली असता राजू शेट्टींचे चुकले काय, हा प्रश्न आता पडला आहे.

Lok Sabha Election Result 2019 : मावळमधून पार्थ पवार पिछाडीवर, राष्ट्रवादीला धक्का

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election result 2019 hatkangale constituency results raju shetti dhairyashil mane shiv sena hatkangale