पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा आमच्या जागा वाढतील, शिवसेनेचा विश्वास

उद्धव ठाकरे

रविवारी जाहीर झालेल्या सगळ्याच एक्झिट पोलनी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीलाच जास्त जागा मिळतील, असे भाकीत केले आहे. तरीही गेल्या निवडणुकीपेक्षा या दोन्ही पक्षांच्या जागा कमीच होणार आहेत, असेही एक्झिट पोलमधून दिसून आले. शिवसेनेने मात्र एक्झिट पोलमधून जी दिशा दिसते आहे, त्यावर समाधान व्यक्त केले असतानाच आपल्या पक्षाच्या जागा एक्झिट पोलमध्ये दिलेल्या अंदाजापेक्षा वाढतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना १८ ठिकाणी विजयी ठरली होती.

लोकसभा निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली, यांना मिळणार संधी

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती ३५ ते ३६ जागा जिंकेल, असा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी मिळून ४२ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये यावेळी घसरण होईल, असे दिसते. पण एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपलाच जास्त जागा मिळतील. शिवसेना १० ते १२ जागांवर विजयी ठरू शकते, असे अंदाज आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी देशात वातावरण चांगले आहे, हेच एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून दिसते. केंद्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार येणार, हे मी याआधीही म्हटले होते. एक्झिट पोलने जे अंदाज वर्तविले आहेत. त्यापेक्षा आमच्या जागा नक्कीच वाढतील. 

Maharashtra Exit Poll : राज्यात पुन्हा एकदा युतीच वरचढ ठरण्याचा अंदाज

येत्या चार महिन्यांत राज्यात विधानसभेची निवडणूक होते आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये शिवसेनेचा परफॉर्मन्स काय राहिल, याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष आहे. शिवसेनेला विधानसभेत जास्त जागा मिळवण्यासाठी लोकसभेत त्याची स्थिती काय राहिल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, अशी आम्हाला आशा आहे. युतीच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले. एक्झिट पोलमधील अंदाजांनुसारही देशात पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. लोकांकडून आम्हाला जो काही निकाल मिळेल, तो आम्ही विनयपूर्वक स्वीकारण्यास तयार आहोत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल काहीही लागू दे. त्याचा पुढील विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावर काहीही परिणाम होणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आधी केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर येऊ दे. मग आम्ही राज्यातील निवडणुकांचे पाहू, असे त्यांनी म्हटले आहे.