पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या तिघांना जेलची हवा

महिलेसमोर अश्लिल कृत्य करणाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. बारामती शहरामध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन केलेल्या तिघांविरोधात पोलिसांनी कारवाई करत अटक केली. त्यांना बारामती कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना तीन दिवसांची जेल किंवा ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. लॉकडाऊन दरम्यान कोर्टाने शिक्षा सुनावल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. 

निजामुद्दीनमध्ये जे घडलं ते इथे घडू देऊ नका, शरद पवार यांची विनंती

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका, गर्दी टाळा, प्रवास करु नका असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र तरी सुद्धा अनेक नागरिक या नियमांचे पालन करत नाहीत. बारामतीमध्ये विनाकारण दुचाकीवरुन फिरणाऱ्या आणि दुकानं सुरु ठेवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. 

भारतात कोरोना विषाणू संक्रमणाचा वेग तुलनेत कमी, इराणमध्ये सर्वाधिक

वारंवार सांगून देखील लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी बारामती पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांना बारामती कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना तीन दिवसांची जेल किंवा ५०० रुपयांच्या दंडाची ठोठावला आहे. ज्यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे ते बारामतीतील श्रीरामनगर, सूर्यनगरी आणि वडगाव निंबाळकर येथे राहणारे आहेत. 

कोविड-१९ : गौतम गंभीर यांचे दोन वर्षांचे वेतन पंतप्रधान मदत निधीला