पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगली: विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांच्या ३०० दुचाकी पोलिसांकडून जप्त

विनाकारण दुचाकी चालवणाऱ्यांवर सांगली पोलिसांची कारवाई

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तरी सुद्धा अनेक जण विनाकारण दुचाकी घेऊन घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांवर आता सांगली पोलिसांनी कारवाई करण्यास सरुवात केली आहे. दुचाकी घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.  

कोरोना इम्पॅक्ट : सरकारी कर्मचाऱ्यांच्या, आमदारांच्या वेतनात मोठी कपात

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने सर्वांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार आहे. अशात सांगलीमध्ये तर घरपोच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सुद्धा अनेक जण भाजीपाला, किराणा, औषध आणायला जात असल्याचे कारण सांगून दुचाकी घेऊन फिरत आहेत.

लॉकडाऊनदरम्यान विजय मल्ल्याचा पुन्हा कर्ज फेडण्याचा प्रस्ताव

सांगली शहर पोलिस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त केल्या जातील असा इशारा दिला होता. त्यानुसार आता सांगली पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवार सकाळी ७ वाजल्यापासून पोलिसांनी गाड्या जप्तीच्या कारवाईला सुरुवात केली. आतापर्यंत पोलिसांनी ३०० पेक्षा जास्त गाड्या जप्त केल्या आहेत. 

धन्य निर्णय! कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांना दिले रेनकोट, सनग्लासेस

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ज्यांच्याकडे  कागदपत्र आणि लायसन्स नाहीत. त्या गाड्या संचारबंदी उठल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनंतर देण्यात येणार आहे. तोपर्यंत या गाड्या पोलिस ठाण्यातच राहणार आहेत. तर ज्या गाड्यांचे कागदपत्र आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसंच, लॉकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणार नसल्याची ग्वाही दिल्यानंतर त्यांना गाडी देण्यात येणार असल्याचे सांगली पोलिसांनी सांगितले. 

व्हा सावध!, पीएम केअर्स फंडच्या नावाने बनावट वेबसाइट्स सक्रिय