पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अतिक्रमण हटवल्याचा रागातून कोल्हापूरात पोलिसाचे घर पेटवले

कोल्हापूरात पोलिसाचे घर पेटवले

अतिक्रमण हटवल्याच्या रागातून कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी इथं पोलिस निरीक्षक  संजय पतंगे यांचे घर रॉकेल ओतून पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये संजय यांच्या घराचा काही भाग जळाला असून त्यांची खासगी चारचाकी गाडीसुद्धा यामध्ये जळून खाक झाली आहे. 

कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीनं आंध्रप्रदेशमधल्या शेतकऱ्याची आत्महत्या

मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या प्रकरणात संशयित सुभाष देसाई याला ताब्यात घेण्यात  आले आहे. तो गारगोटी मधून पळून गेला होता. त्याला महागावमधून अटक करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी निवासस्थानाच्या आवारात  सुभाष देसाई या संशयित आरोपीनं अतिक्रमण केलं होतं. हे अतिक्रमण संजय पतंगे यांनी हटवले. याच रागातून मंगळवारी रात्री संजय पतंगे यांचं घर पेटवलं.

धक्कादायक! दिल्लीत एका घरात सापडले ५ जणांचे मृतदेह

या आगीमुळे पोलिस निरीक्षक  संजय पतंगे यांच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.