पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यातील मीरा वाघिणीच्या मृत्यूची घटना ताजी असताना मंगळवारी सकाळी एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूलजवळ रेल्वेने धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झाला आहे. या घटनाची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेवरून गोंधळ, SPG सुरक्षा काढण्याची चर्चा

चंद्रपूर जिल्ह्यातील मूलजवळ बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजरने एका बिबट्याला धडक दिली. रेल्वेच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. बिबट्या रुळावर चालत असताना बल्लारपूरवरून गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वेखाली तो आला. दरम्यान, या बिबट्याचे वय साधारण ३ ते ४ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. 

पुण्यात ‘राज’गर्जना, मनसेच्या प्रचारास होणार प्रारंभ