पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रपूरः घरात झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्याने पळवले

बिबट्या (संग्रहित छायाचित्र)

घरात झोपलेल्या ९ महिन्याचा चिमुकल्याला बिबट्याने पळवल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. कुटुंबीयांनी शोधाशोध केल्यानंतर त्या चिमुकल्याचा मृतदेहच सापडला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या गावात घडली. स्वराज गुरनुले असे या दुर्देवी चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यातील डॉक्टराला 'जय श्री राम' नामाचा जप करण्यासाठी जबरदस्ती

अधिक माहिती अशी, स्वराज हा घरात झोपलेला असताना बिबट्याने त्याला घरातून पळवून नेले. शोधाशोध केल्यानंतर चिमुकल्याचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिस कँटिनमधील पैशाचा गैरव्यवहार, सहायक निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल