पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लक्ष्मण माने राष्ट्रवादीचे हस्तक, गोपीचंद पडळकरांचा आरोप

गोपीचंद पडळकर

वंचित आघाडीचे लक्ष्मण माने यांनी केलेल्या आरोपांना पक्षाचे महासचिव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लक्ष्मण माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असून ते जसे सांगतील, तसे बोलतात, असा आरोप त्यांनी केला आहे. संघातून आलेल्या पडळकर आणि अजेरिया यांनी महत्वाची पदे दिल्याचा आरोप करत प्रकाश आंबेडकरांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना पडळकर यांनी माने यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, माने यांनीही पडळकरांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. आपण २००९ सालीच राष्ट्रवादीचा त्याग केला. पवार हे माझे ४० वर्षांपासून मित्र आहेत. मी तत्वापासून कधीच चुकलो नसल्याचे ते म्हणाले.

वंचित आघाडी संघ स्वयंसेवकांच्या हाती, लक्ष्मण मानेंचा गंभीर आरोप

'एबीपी माझा'शी बोलताना ते म्हणाले की, वंचितच्या महासचिवपदी माने यांनीच माझे नाव सुचवले होते. पुण्यातील बैठकीत त्यांनी माझे नाव सुचवले होते. उलट माने यांना प्रदेशाध्यक्षपद हवे होते. पण संघटनेतील कार्यकर्ते आंबेडकरांच्या नावासाठी आग्रही होते. मानेंना पक्षात प्रमुखपद हवे आहे, म्हणून ते अशाप्रकारची वक्तव्ये करत आहे. मी पूर्वी भाजपत होतो, हे जगजाहीर आहे. वंचितमध्ये प्रवेश करत असताना मी याची माहिती दिला होती.

उलट माने हे राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. ते पूर्वी राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादी जे सांगेल तेच माने बोलत आहेत, असा आरोप त्यांनी केला.