पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लातूर, अंबाजोगाई शहराचा पाणी पुरवठा १ ऑक्टोबरपासून बंद

मांजरा धरण पाणीसाठा

लातूर, अंबाजोगाई शहरांचा पाणी पुरवठा १ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. मांजरा धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. यापुढे याठिकाणच्या नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. 

सायबर हल्ले, सर्जिकल स्ट्राइकचा सामना करण्यासाठी ३ नविन सुरक्षा एजन्सी

लातूर, अंबाजोगाई शहरासह बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र या पुढे या गावांना पाणी पुरवठा होणार नाही कारण मांजरा धरणातील पाणीसाठा संपला आहे. सर्वच पाणी पुरवठा योजना येत्या १ ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिका-यांची विशेष बैठक घेऊन या सूचना दिल्या आहेत.

अफगाणिस्तान बॉम्बस्फोटाने हादरले; ४८ जणांचा मृत्यू 

लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नगर परीषद, ग्रामपंचायत, महानगरपालिका यांच्या प्रमुख अधिका-यांची एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी धरणातून १ ऑक्टोबरपासून पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे यापुढे प्रति घर फक्त २०० लिटर पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येईल. त्यादृष्टीने सर्वच अधिका-यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. 

मुख्यमंत्र्यांच्या शब्दांवर विश्वास, भाजपत प्रवेश करणारः राणे

लातूरमध्ये दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाई आहे. गेल्या अनेक वर्षापासून याठिकाणी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मांजरा धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे सर्वच पाणी पुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत. यात आता पाणीपुरवठा बंद केल्यामुळे लातूरकरांसह अंबाजोगाई, बीड, उस्मानाबाद येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

पुणे-मुंबईसह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा