पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लासलगाव प्रकरण: पीडितेची प्रकृती गंभीर, उपचारासाठी मुंबईला हलवले

लासलगावमध्ये महिलेला जिवंत जाळले

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे शनिवारी सायंकाळी एका महिलेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये पीडित महिला ६७ टक्के भाजली होती. दरम्यान, पीडित महिलेवर नाशिक येथे उपचार सुरु होते. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला मुंबईला हलवण्यात आले. मुंबईतील मसीना रुग्णालयात पीडित महिलेवर पुढील उपचार होणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. 

उद्धव ठाकरेंकडे पॉवर असू शकते, पण.., काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया
 
शनिवारी सायंकाळी निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकाच्या आवारात पीडित महिलेला जिवंत जाळण्यात आले होते. दोन ते तीन जणांनी ही कृत्य केले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पीडित महिला आणि संशयितांमध्ये वाद सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या वादाचे पर्यावसन पेट्रोल टाकून पेटवण्यात झाले. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

उद्या कशाला आत्ताच सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं भाजपला

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर मुख्य संशयित आरोपीला येवला येथून ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पीडितेची भेट घेत विचारपूस केली. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण सध्या पीडितमहिलेला वाचणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच,  बाटलीत पेट्रोल मिळणे हा अपराधच असून असे पेट्रोल विकले जात असेल तर तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

...तर कीर्तन सोडून शेती करेन, इंदुरीकर महाराज व्यथित