पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडितेचा मृत्यू

लासलगाव प्रकरणातील पीडितेचा मृत्यू

लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील मसीन बर्न रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरु होते. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास तिचा मृत्यू झाला आहे. पीडित महिलेच्या मृतदेहावर जे. जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह लासलगाव येथे पाठवण्यात आला आहे. 

हिंदुंच्या सहिष्णुतेला कमजोरी समजण्याची चूक करु नका : फडणवीस

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे १५ फेब्रुवारी रोजी बसस्थानकाच्या आवारात पीडित महिलेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये पीडित महिला ६७ टक्के भाजली होती. पीडित महिलेवर सुरुवातीला नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचासाठी तिला मुंबईतील मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले, PM मोदींनी मला वचन दिले!

लासलगाव जळीतकांड प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी रामेश्वर भागवतला येवल्यातून अटक केली होती. याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वरसह पेट्रोलपंपाचा मॅनेजर आणि पीडित महिलेला बाटलीमध्ये पेट्रोल दिलेल्या कर्माचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपींविरोधात कडक कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

तिसऱ्यांदा हुकली पूनम यादवची हॅटट्रिक!