पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परशूराम घाटात पुन्हा दरड कोसळली

ब्रेकिंग न्यूज

परशूराम घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे परशूराम घाटामध्ये मोठी दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर परशूराम घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान दरड कोसळल्याने कोणत्याही गाडीचे नुकसान झाले नाही. दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरु आहे. 

धोकादायक इमारतीची नोटीस पाठवली होती; पालिकेचा दावा

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खेड आणि चिपळूनमध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. तर सोमवार रत्नागिरीतील जगबुडी आणि चिपळूनमधील वाशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर परशूराम घाटात देखील दरड कोसळली होती. दरम्यान, दुसऱ्या दिवशी देखील मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कारण परशूराम घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. दरड हटवण्याचे काम सुरु आहे. मात्र दरड कोसळल्याने घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.  

पुण्यातील खड्ड्यामुळे जर्मनीचे लोकही त्रस्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार