पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रत्नागिरीच्या मिरजोळे येथे भूस्खलन; जमिनीचा भाग ४० फूट खोल खचला

रत्नागिरीत जमीन खचली

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे मिरजोळे येथील खालचापाट येथे भूस्खलनाची घटना घडली आहे. सलग पडणाऱ्या पवासामुळे जमिनीचा मोठा भाग खचला. त्यामुळे मिरजोळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थीचा प्रश्नच नाही - राजनाथ सिंह

मिरजोळे येथील खालचापाटमध्ये भूस्खलन झाले आहे. मुसळधार पावसामुळे तीन ते चार एकर शेत जमीन खचली आहे. जमिनीचा भाग १०० फूट लांब आणि ४० फूट खोल खचला आहे. नदीचा प्रवाह बदलल्याने भूस्खलन झाले आहे. त्यामुळे १६ एकर परिसरातील जमीन आणि घरांना धोका निर्माण झाला आहे. २००६ नंतर पुन्हा एकदा खालचापाट येथे भुस्खलन झाले आहे. त्यावेळी उपाययोजना करण्यात आल्या होता. मात्र त्यासाठी केलेला लाखोंचा खर्च वाया गेला आहे. 

फसवणूक प्रकरणी भारतीय उद्योजक प्रमोद मित्तल यांना अटक

रत्नागिरीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका बुधवारी गणपतीपुळे देवस्थानाला बसला. पावसामुळे गणपतीपुळे देवस्थानाची सुरक्षा भिंत कोसळली. भक्तांसाठी उभारण्यात आलेल्या प्रदक्षिणा मार्गावरील सुरक्षा भिंत पावसामुळे ठिकठिकाणी खचली. तसंच तलावाजवळची सुरक्षा भिंत देखील कोसळली. त्यामुळे मंदिर देवस्थानाचे मोठे नुकसान झाले.