पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माहेरहून पैसे आणण्यावरून ऊसतोड मजुराकडून पत्नीचा खून

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

माहेरून पैसे आण म्हणून एका ऊसतोड मजुराने पत्नीला डोक्यात काठीने मारून तिचा खून केल्याची घटना चिंचपूर (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) येथे घडली. याप्रकरणी मंद्रूप पोलिसांत पती, सासू व सासरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शामका कृष्णा राठोड (रा. कोठाळा, ता. सोनपेठ, जि. परभणी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 

खळबळजनक: नांदेडमध्ये चार शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

अधिक माहिती अशी, चिंचपूर येथे एका साखर कारखान्याची ऊसतोड करणारी परभणीची टोळी आली आहे. खून झालेली महिला व तिचे पती, सासू-सासरे येथे ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. शामकाला माहेरून पैसे का आणत नाही म्हणून पती कृष्णा साहेबराव राठोड याने काठीने जोरात मारले. यामुळे ती खाली पडली. यावेळी तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही पतीने केला. डोक्यास गंभीर जखम झाल्याने शामका हिचा जागीच मृत्यू झाला.

युती तोडल्याचा शिवसेनेला पश्चाताप होणार: देशमुख

याप्रकरणी पती कृष्णा राठोड, सासरा साहेबराव श्यामराव राठोड व सासू निलाबाई साहेबराव राठोड या तिघांविरुद्ध पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.