पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुस्तीच्या पंढरीत शोककळा! रुस्तम-ए-हिंद पैलवान दादू चौगुले यांचे निधन

पैलवान दादू चौगुले

देश-विदेशातील अनेक मल्लांशी भिडत त्यांना लाल माती आणि मॅटवर अस्मान दाखविणारे हिंद केसरी, रुस्तम ए हिंद, महाराष्ट्र केसरी आणि ध्यानचंद पुरस्कार विजेते पैलवान दादू चौगुले यांचे रविवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. सायंकाळी  ५ वाजून ३० मिनिटांनी कोल्हापुरातील पंचगंगा वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

'कालच्या घटनेनंतर जग सोडून जावं असं वाटतंय'

राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या छोट्याशा गावात दादू चौगुले यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती हालाकीची. पण मुलाला पैलवान करायचं या हट्टानं त्यांच्या आई-वडीलांनी पोटाला चिमटा काढून त्यांना खुराक पुरवला. वयाच्या १० व्या वर्षी ते आखाड्यात उतरले. 'हिंद केसरी'चे मानकरी आणि वस्ताद गणपत आंदळकरांनी त्यांच्यातील चुणूक ओळखत त्यांना कुस्तीचे डावपेच शिकवले. महाराष्ट्रातील आखाड्यात दबदबा मिळवल्यानंतर त्यांनी परदेशातील मैदानंही गाजवली. 

पीओकेतील भारतीय लष्कराच्या कारवाईवर संरक्षण मंत्र्यांची नजर

१९७३ मध्ये न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये १०० किलो वजनी गटात त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली होती. कुस्तीला एक विशेष उंची देणाऱ्या दादू चौगुले यांना भारत सरकारने मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित केले होते.