पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील भीषण पुरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांनी रशिया दौरा टाळला

देवेंद्र फडणवीस

राज्यातील कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील महापूराच्या परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रशिया दौरा रद्द केल्याचे वृत्त आहे. केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरात, गोवा, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ तीन दिवसीय रशिया दौरा नियोजित होता. मात्र राज्यातील भीषण पुराच्या परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांनी रशियाला दौऱ्याला जाणे टाळले आहे. 

कोल्हापूर-सांगली महापूर : दोन लाखांहून अधिक पुरग्रस्तांचे स्थलांतर

या दौऱ्यात पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखालील ५ राज्यातील मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ रशियाचे उप-पंतप्रधान यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या भेटी घेणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या दौऱ्यासाठी निवड केली होती. मात्र देवेंद्र फडणवीसांनी पूरस्थितीमुळे या दौऱ्याला जाणार नाहीत.