पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूर-सांगली महापूर : दोन लाखांहून अधिक पुरग्रस्तांचे स्थलांतर

काही पुरग्रस्त जिल्हापरिषदांच्या शाळेच्या निवाऱ्याला विसावले आहेत.

पंचगंगेच्या पातळीत कमालीची घट झाल्याने पाणी ओसरु लागले आहे. अलमट्टी धरणातून ५ लाख ३० हजार क्युसेक विसर्ग सुरु असून राधानगरी धरणाचे २ स्वयंचलित दरवाजे खुले असून त्यामधून ४ हजार २५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून ५३ हजार ८८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी रविवारी दिली.

आजअखेर एकूण २४९ गावांमधून ५० हजार ५९४ कुटुंबातील २ लाख ४५ हजार २२९ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यात शिरोळ तालुक्यातील ४२ गावामधून ३१ हजार ३८ कुटुंबातील १ लाख ५५ हजार १८६ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी ५० फूट ११ इंच इतकी होती. परिणामी  एकूण १०४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर ८.२६ टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 

कोल्हापूर/सांगली महापूरः पाणी ओसरतंय, मदत कार्यालाही वेग           

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे
तुळशी ३.२८  टीएमसी, वारणा ३२.४६ टीएमसी, दूधगंगा २३.५३ टीएमसी, कासारी २.५७ टीएमसी, कडवी २.५२ टीएमसी, कुंभी २.५२ टीएमसी, पाटगाव ३.७२ टीएमसी, चिकोत्रा १.३७, चित्री १.८८ टीएमसी, जंगमहट्टी १.२२ टीएमसी, घटप्रभा  १.५६ टीएमसी, जांबरे ०.८२ टीएमसी, कोदे (ल. पा.) ०.२१ टीएमसी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे  
राजाराम ५०.११ फूट, सुर्वे ४८.६ फूट, रुई ७९.७ फूट, इचलकरंजी ७८ फूट, तेरवाड ८२.१ फूट, शिरोळ ७७.५ फूट, नृसिंहवाडी ७७.५ फूट, राजापूर ६२.९  फूट तर नजीकच्या सांगली ५४.५ फूट आणि अंकली ५९.३  फूट अशी होती.