पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूर/सांगली महापूरः पाणी ओसरतंय, मदत कार्यालाही वेग

सांगलीत मदतकार्याला वेग आला आहे (ANI)

कोल्हापूर, सागंली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाने घेतलेली विश्रांती आणि अलमट्टी धरणातून वाढवलेला विसर्ग यामुळे या दोन्ही शहरांतील पाणी कमी होऊ लागले आहे. पूरग्रस्त भागातील मदतकार्याला वेग आला आहे.

सव्वाचार लाख नागरिक सुरक्षितस्थळी, नौदलाची १५ पथके शिरोळकडे रवाना

दरम्यान, कोल्हापुरात पंचगंगेची पातळी अजूनही धोक्याच्या पातळीवर ७ ते ८ फूट आहे. आज (रविवार) सकाळच्या सुमारास पावसाची संततधार सुरु होती. त्यानंतर अनेक दिवसांनंतर कोल्हापूरकरांना सुर्य दर्शन झाले. आता कोल्हापुरात विविध ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे कृष्णा नदीची पातळीही सध्या ५४ फूट ६ इंच इतकी आहे. सांगली जिल्ह्यात सध्या पावसाने उसंत घेतली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

अंत्ययात्रा थांबून काढा, तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाही; आव्हाडांची भाजपवर टीका
 
या दोन्ही जिल्ह्यातील पावणेचार लाख पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षित जागी स्थलांतर करण्यात आले आहे. या नागरिकांच्या अन्न, पाणी, निवाऱ्याची करण्यात आलेली सोय; जीवनावश्यक वस्तूंचा सुरू झालेला पुरवठा; प्रशासन, आपत्ती निवारण पथके, लष्कर, पोलीस यंत्रणेसोबतच स्वयंसेवी संस्था मोठ्याप्रमाणात काम करत आहेत.

पूरग्रस्तांना मदतीसाठीच्या धान्यावर भाजप आमदाराचा फोटो, विरोधकांची टीका