पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापुरात पूरग्रस्त भागातील महिलांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

आंदोलक महिलांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केले.

कोल्हापूरमधील १०० टक्के पूरग्रस्त भागातील छत्रपती शासन महिला आघाडीच्या महिलांनी शुक्रवारी सकाळी मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरजवळ रास्ता रोको आंदोलन केले. महिलांनी थेट महामार्गावर चूल लावून अन्न शिजवून आपल्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विनंती केल्यावरही महिला न हटल्याने पोलिसी बळाचा वापर करून तेथून हटविण्यात आले. 

कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार

आंदोलक महिलांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते. त्याच पद्धतीने पूरग्रस्त भागातील महिलांचेही कर्ज सरकारने माफ केले पाहिजे. आमच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले आहे. 

पोलिसांनी या महिलांना बळाचा वापर करून हटविण्यास सुरुवात केल्यावर आमचे काही बरे-वाईट झाले तर त्याला पोलिसच जबाबदार आहेत, असे आंदोलनकर्त्या महिलांनी म्हटले आहे. 

'बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा'

यावर्षी ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये मोठा पूर आला होता. कोल्हापूर शहरातील मोठा भाग पुराखाली होता. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गही पुराच्या पाण्यात सापडला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक त्यावेळी जवळपास आठवडाभर ठप्प झाली होती. पुरामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.