पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्लॉग : भावा कोल्हापूरकराचा मटण दरवाढीनं 'बकरा' नाय व्हायचा!

कोल्हापूरमधील मटन दरवाढीचा मुद्दा अखेर निकाली निघाला.

कोल्हापूर म्हटलं की झणझणीत तांबडा-पांढरा. इथं पाहुण्याच स्वागत मटणाच्या मेजवानीशिवाय अशक्यच. (सॉरी पण व्हेजेटरियन लोकांना  कोल्हापूरकरांचा खरा पाहुणचारचा कधीच कळणार नाही) याठिकाणी एखाद्याच्या घरात पाहुणा आला आणि त्याच्यासाठी घरात मटणाची फोडणी टाकली नाही तर तर पाहुण्याला मटण खाऊ घातलं नाही, अशी शेजारीपाजारी चर्चा फक्त अन् फक्त कोल्हापुरातच होऊ शकते.

एकीकडे कांद्याच्या भाववाढीमुळे देशात सामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आल्यानं मोर्चे निघत असताना कोल्हापूरकरांचे मटणाच्या दरवाढीने वांदे केले. देशभरात कांद्याच्या दरवाढीसंदर्भात आंदोलने केली जात असताना कोल्हापुरात मटणाच्या दरासाठी आंदोलन उभे राहिल्याचे पाहाला मिळाले. जगाच्या पाठीवर हा प्रकार फक्त कोल्हापुरातच होऊ शकतो.  कोल्हापूरातील मटणाचे दर हे ५५० ते ६०० च्या घरात गेल्यानंतर समस्त कोल्हापूरकरांनी मटण विक्रेत्यांच्या विरोधात आवाज उठवला. हा उठाव एखाद्या समाजाच्या विरोधात नव्हता हे देखील तेवढेच खरे.  

जीव मुठीत घेऊन हेल्मेट घालून कांदे विकण्याची वेळ

शेजार-पाजारील गावात मटनाचे दर स्थिर असताना कोल्हापूरात मटणासाठी अधिक पैसे का मोजावे लागतात? हा त्यांचा स्वाभाविक प्रश्न होता. विक्रेते ऐकायला तयार नसल्यामुळे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेले. एका बाजूला जिल्हाधिकारी कार्यालयातून मटण दरवाढीच्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती काम करत असताना कोल्हापूरातील विविध मंडळांनी स्वस्तात मटण उपलब्ध करुन देणारे स्टॉलच मांडायला सुरुवात केली. 

हे पाच पदार्थ त्वचेला देतील नैसर्गिक उजळपणा

मटण दरवाढीविरोधात कसबा बावडा परिसरामध्ये आंदोलन छेडले गेले. स्थानिक मटण विक्रेत्यांनी मटण विक्री बंद ठेवल्यानंतर कसबा बावडा ग्रामस्थांच्यावतीने पंचगंगा नदीच्या बाजूला राजाराम बंधारा लगत हॉटेल किनारा जवळ मटण विक्री करण्याची व्यवस्था करण्यात आली. ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे मिक्स मटण (आतडी कोथळा वझडी वैगेरे ) ४०० रुपये प्रति किलो आणि नुसते मटण ४५० रुपये प्रति किलोने देण्यात आले. 

खवय्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एकाबाजूला शहरातील मंडळे मटण किफायतशीर दरात मिळवून देत होती. दुसरीकडे मटण विक्रेते आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरु होती. मटणाच्या दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी मिक्स मटण ४५० आणि प्युअर मटन ५२० या दरानेच ते विक्री करण्यावर ठाम होते. मागील दीड महिन्यांपासून सुरु असलेला मटण दरवाढीच्या वादावर अखेर मंगळवारी तोडगा निघाला. प्युअर मटण ४८० रुपये प्रति किलो असा दर ठरविण्यात आलेला असून तो दर मटण विक्रेत्यांनी मान्य केलाय. 
 
मीठ किती खावे?

कृती समितीच्या बैठकीत खाटीक समाज ५०० रुपये दर मिळावा यासाठी आग्रही राहिला. त्यानंतर ते ४९० रुपये प्रति किलो या दरापर्यंत आले. पण कसबा बावड्यामध्ये कार्यकर्त्यांनी ४७० रुपये प्रतिकिलो मटण विक्री करुन दाखवल्यामुळे शेवटी कोल्हापूर शहरात  ४८० रुपये प्रति किलो दराने मटण विक्री करण्याचे ठरवण्यात आले. संयुक्त समितीने मान्यता दिल्याशिवाय मटण दरामध्ये कोणत्याही प्रकारे दरवाढ केली जाऊ नये, यावरही एकमत झाले.