पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

४८० रुपये किलो दरात नफा नाही, कोल्हापूरात मटण विक्रेते संपावर

कोल्हापूरात मटण विक्रेते संपावर

कोल्हापूरात मटणाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. कोल्हापूरातील मटण विक्रेत्यांनी ६ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे कोल्हापूरकर नाराज आहेत. मटणाचा दर जिल्ह्याधिकाऱ्यांनी ४८० रुपये किलो असा ठरवून दिला आहे. मात्र या दरामुळे कोणत्याही प्रकारचा नफा होत नसल्याचं मटणविक्रेत्यांचं म्हणणं आहे. 

 ''बोकडांच्या किमती वाढल्या आहेत. जिल्ह्याधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या किमतीत मटण विकणं आम्हाला शक्य नाही. कारण यात आमचा नफा होत नाही. नफाच नसेल तर जगणं अवघड आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शहरात मटण ६०० रुपये  किलोनं विकलं जात आहे. आम्ही मात्र तोटा सहन करत आहोत. आम्ही शांततेत आंदोलन सुरु केलं आहे, त्यामुळे  मटणाची विक्री आम्ही थांबवली आहे'', असं कोल्हापूरच्या खाटिक संघटनेचे अध्यक्ष विजय कांबळी म्हणाले. 

जेएनयू हल्ला : व्हॉट्स अ‍ॅप मेसेज, फोटोंमुळे संशयाची सुई अभाविपकडे?

पुण्यातही मटणाचे दर वाढले आहेत त्यामुळे अनेकांनी मटणाऐवजी कोंबडीचा पर्याय निवडला आहे. मटणाच्या वाढीव दरानं चिकनच्या मागणीत पुण्यात वाढ झाल्याचं मटण विक्रेते पंकज तुपटेवार म्हणाले.''सध्या मटण विक्रेत्यांना मोठा तोटा होत आहे. पुण्यात दिवाळीपासूनच मटणाचा दर प्रतिकिलोमागे ६०० रुपये असावा अशी मागणी आम्ही करत आहोत. सोमवारी आम्ही  कर्नाटकातून १० बोकड खरेदी केली. तिथे मटणाचा दर तर ६२५ रुपये प्रतिकिलो होता.  कोल्हापूरच्या मटण विक्रेत्यांनी केलेली मागणी रास्त आहे, त्यांनी तोटा का सहन करावा?'', असा सवाल अहिल्यादेवी मटण शॉपचे मालक विठ्ठल थोरपे यांनी केला आहे. 

ऑपरेशन मेघदूतचे नायक जनरल पीएन हून यांचं निधन

१ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१९ दरम्यान कोल्हापूरात मटणाचे दर वाढले आहेत. ४५० रुपयांवरून मटणाचा दर प्रतिकिलोमागे कोल्हापूरात ६५० रुपये झाला आहे. त्यानंतर १२ डिसेंबरला कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन केली.  मटण दरवाढीविरोधात कोल्हापूरकरांनी केलेल्या आंदोलनविषयी अधिक माहिती  समितीनी मिळवली. या माहितीच्या आधारे अहवाल तयार करून कोल्हापूरात मटणाचा एकच दर ठरवण्यात आला. यानुसार किलोमागे ४८० रुपये दर निश्चित करण्यात आला. 

औरंगाबादमध्ये विषारी इंजेक्शन घेऊन डॉक्टरची आत्महत्या

मात्र कोल्हापूरातील मटणाचे दर निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाही, म्हणूनच आम्ही आंदोलन पुकारलं असल्याचं मटण विक्रेत्यांनी सांगितलं.