पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भरसभेत नगरसेवकाने घेतला मुका; कोल्हापूर महापालिकेतील प्रकार

नगरसेवकाने घेतला मुका

सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेली कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या भर सभेमध्ये विरोधी गटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याचा मुका घेतला. अचानक झालेल्या या प्रकाराकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आणि सभागृहातील उपस्थित सर्व नगरसेवक हसू लागले. 

कायदेशीर सल्ला घेऊनच योग्य निर्णय घेणार: गृहमंत्री

कोल्हापूर महापालिकेच्या सहभागृहात आज महापौर राजीनाम्याची विशेष सभा घेण्यात आली होती. विरोधी गट असलेले ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे सत्ताधारी गटाच्या बाकावर येऊन बसले. त्यांच्या बाजूला काँग्रेसचे गटनेते आणि स्थायी समितीचे सभापती शारगंधर देशमुख बसले होते. सभागृहाचे कामकाज सुरु झाले. त्यावेळी दोघांमध्ये काही तर बोलणे सुरु होते. अचानक खूश होऊन कमलाकर भोपळे यांनी शारगंधर देशमुख यांना मिठी मारली आणि त्यांच्या गालाचा मुका घेतला.  

'मराठा समाजातील ३५०० उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या, अन्यथा...'

भरसभेमध्ये अचानक झालेल्या या प्रकारामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आणि सभागृहात सर्व जण हसू लागले. दोघांमध्ये नेकमी काय चर्चा सुरु होती ही माहिती समोर आली नाही. मात्र त्यांच्या मुक्याचा हा व्हिडिओ सध्या  व्हायरल होत आहे. सभागृहात घडलेल्या या प्रकारामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. महिला नगरसेवकांच्या समोरच हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

जामिया परिसरात तरुणाचा गोळीबार, एक जण जखमी