पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापूरमधील पूर कायम

कोल्हापूरमधील पूरस्थिती

गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील गावांना पडलेला पुराच्या पाण्याचा वेढा शनिवारीही कायम आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी एक फुटाने कमी झाल्याचे शनिवारी सकाळी दिसले. पण अद्याप नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहात असल्यामुळे पूर कायम आहे. शहराच्या अनेक भागात साचलेले पाणी जैसे थे असून, बहुतांश नागरिक हे सुरक्षितस्थळी वास्तव्याला आहेत. 

सलग सहाव्या दिवशी सांगलीत पुराचे पाणी, पाणी पातळी एक फुटाने उतरली

कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे दरवाजे उघडलेले असून, त्यातून विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे कर्नाटकमधील आलमट्टी धरणातून शुक्रवारी रात्रीपासून ४८०००० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याचा परिणाम जाणवण्यास आणखी वेळ लागेल. पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ३६ ते ३७ मीटरपर्यंत खाली येत नाही, तोपर्यंत शहरातील पाणी ओसरणार नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

कोल्हापूरमधील पूरस्थितीमुळे गेल्या मंगळवारपासून बंद असलेला मुंबई ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अद्याप वाहतुकीसाठी सुरू झालेला नाही. कोल्हापूर अलिकडेच सर्व वाहने थांबवून ठेवण्यात आली आहेत. महामार्गावरील पुराचे पाणी ओसरत नाही, तोपर्यंत तो सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.

पूरग्रस्तांच्या मदतकार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही - मुख्य सचिव

कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफ, लष्कर, नौदल, एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी घेऊन जाण्याला सध्या प्राधान्य देण्यात येत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या निवासी शिबिरांमध्ये ठेवलेल्या लोकांना, घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लोकांना विविध वस्तू, शिजवलेले अन्न पाठविण्याला प्राधान्य दिले जात आहे.

कोल्हापूरमधील शुक्रवारची स्थिती