पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापुरात पूरस्थिती अद्याप कायम

कोल्हापुरातील पूरस्थिती

कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत काहीशी घट झाल्याने शुक्रवारी मदतकार्याला वेग येणार आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा आणि शहरातील परिस्थिती पुराच्या पाण्यामुळे गंभीर बनली आहे. पंचगंगा नदीचे पाणी धोक्याची पातळी ओलांडून शहराच्या बहुतांश भाग शिरल्याने लाखो लोक पाण्यात अडकले होते. आतापर्यंत सव्वा लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे मुंबई ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूरजवळ बंद करण्यात आला होता.

पूरग्रस्त भागात शिवसेना आरोग्य शिबिरांचे आयोजन करणारः उद्धव ठाकरे

गुरुवारी दिवसभर कोल्हापूर आणि परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे राधानगरी धरणातून होणारा विसर्गही कमी झाला. यामुळे पुराचे पाणी ओसरण्याला मदत झाली आहे. दोन फुटांनी पाणी पातळी कमी झाल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. तरीही कोल्हापूरच्या अनेक भागांत अद्याप पुराचे पाणी आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंची टंचाईमुळे नागरिकांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागते आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कोल्हापूरमधील पुराच्या स्थितीची हवाई पाहणी केली. यानंतर त्यांनी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असून, या तिन्ही जिल्ह्यांसाठी आवश्यक ती सर्व मदत शासन उपलब्ध करून देईल, असे सांगितले. 

भामरागडमध्ये नदीचे पाणी घरात घुसले, संततधार पाऊस सुरुच

कोल्हापूर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या पाण्याने बाधित झाली असून, १८ गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. शहरात आणि ग्रामीण भागात पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याला प्राधान्य दिले जात आहे. एकूण सुमारे चार हजार घरांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे.