पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूरग्रस्तांना मदतीसाठीच्या धान्यावर भाजप आमदाराचा फोटो, विरोधकांची टीका

स्टिकरवर मुख्यमंत्री आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचा फोटो आहे

पूरग्रस्त कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या गहू आणि तांदळाच्या पाकिटांवर आमदार सुरेश हाळवणकर यांचा फोटो लावल्यामुळे पुन्हा एकदा भाजपवर टीका होऊ लागली. शुक्रवारीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पूरग्रस्त भागात सेल्फीला प्रतिसाद देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. आता दुसऱ्याच दिवशी भाजपच्या आमदाराचा आणखी एक असंवेदनशील प्रकार समोर आला आहे. शासनाच्या मदतीच्या पाकिटांवर स्वतःचा फोटो लावण्याच्या प्रकारावर विरोधकांनी जोरदार टीका केली. हे सरकार केवळ प्रसिद्धिच्या मागे असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मिरच्या विभाजनाचा प्रस्ताव कॅबिनेटकडून ७ मिनिटांत मंजूर

पूरग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि गहू वाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या शिबिरांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तांना घरी जातांना ही पाकिटे वाटण्यात येणार आहेत. पण त्यावर स्वतःचा फोटो लावल्यामुळे सुरेश हाळवणकर यांच्यावर टीका होऊ लागली आहे. 

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापूरमधील पूर कायम

दरम्यान, या विषयावर 'एबीपी माझा'शी बोलताना सुरेश हाळवणकर म्हणाले, जिल्ह्यातील अन्नधान्य पुरवठा दक्षता समितीचा मी अध्यक्ष आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांना १० किलो तांदूळ आणि गहू वाटण्याचा निर्णय घेतल्यावर मी लगेचच काल अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना पाकिटे तयार कऱण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी मला न विचारता, त्यावर लावलेल्या स्टिकरवर माझा फोटो छापला आहे. वास्तविक केवळ सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचा फोटो लावणे अपेक्षित आहे. पण माझा फोटो लावणे योग्य नाही. मी लगेचच अधिकाऱ्यांना फोटो काढण्यास सांगितले आहे. पण आतापर्यंत १० ते १२ हजार पाकिटे तयार झाली असून, त्यापैकी काही वाटण्यात आली आहेत. महाराष्ट्र सरकारकडून ही मदत दिली जात आहे, हे लोकांना कळावे, म्हणूनच या पाकिटांवर स्टिकर लावण्यात आली आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:kolhapur floods one more inhuman practice by bjp mla suresh halvankar placed photo of own on relief food packets