पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे-बंगळुरु मार्गावरील पाणी झालं कमी, ८ दिवसांनंतर जड वाहतूक सुरु

पुणे-बंगळुरु मार्गावरील पाणी झालं कमी, ८ दिवसांनंतर जड वाहतूक सुरु

महापुरामुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेला पुणे-बंगळुरु महामार्ग अखेर आज सुरु झाला आहे. पाणी कमी झाल्यामुळे धीम्या गतीने महामार्गावरील वाहने सोडली जात आहेत. हजारोंच्या संख्येने अवजड वाहने पूर ओसरण्याची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभी होती. आता वाहतूक सुरु झाल्याने वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

राज्यातील भीषण पुरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांनी रशिया दौरा टाळला

पुराच्या पाण्यामुळे तब्बल आठवडाभर बंद असलेल्या कोल्हापूर-पुणे महामार्गावरुन अवजड वाहतुकीला सुरुवात झाली. शिरोली फाट्याजवळ आलेले पुराचे पाणी कमी झाल्याने तिथून ट्रकची वाहतूक सुरु झाली आहे. कराड ते कोल्हापूर मार्गावर असणारे हजारो ट्रक आता पुराच्या पाण्यातून वाट काढत बंगळुरुच्या दिशेने रवाना होत आहेत.

कोल्हापूर-सांगली महापूर : दोन लाखांहून अधिक पुरग्रस्तांचे स्थलांतर

या मार्गावर सुमारे ५ हजार ट्रक अडकले होते, असे सांगण्यात येते. बेळगाव-बंगळुरुच्या दिशेने वाहतूक सुरु आहे. कोल्हापूरहून पुण्याकडे अद्याप वाहतूक सुरु झालेली नाही. त्या मार्गावर पाण्याची पातळी जास्त असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सध्या एका बाजूचीच वाहतूक सुरु आहे. हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दुष्काळाच्या झळाः गेल्या १०० दिवसांपासून परळीकरांच्या नळाला पाणी नाही