पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी २०५७.९८ मिमी पावसाची नोंद

कोल्हापूर पूर

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २०५७.९८ मिमी तर गेल्या २४ तासात सरासरी ९०.३४ मिमी पावसाची नोंद झाली. यात आजरा तालुक्यात सर्वाधिक १६८.२५ मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी ८.५७ मिमी पावसाची नोंद झाली.
     
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- २१.६३ मिमी एकूण ७४३.५७ मिमी, शिरोळ- ८.५७ मिमी एकूण ५२३.८६  मिमी, पन्हाळा- ९१.५७ एकूण १९८५.८६, शाहूवाडी- ६९.१७ मिमी एकूण २२७४.८३, राधानगरी- १०४.६७ मिमी एकूण २४६०.१७ मिमी, गगनबावडा- १६३.५० मिमी एकूण ४९०१.५०मिमी, करवीर- ५४.६४ मिमी एकूण १५५८.३६ मिमी, कागल- ८६.५७ मिमी एकूण १६६१.२८ मिमी, गडहिंग्लज- ९९.४३ मिमी एकूण १२५७.८५ मिमी, भुदरगड- ११०.२०  मिमी एकूण २१७९ मिमी, आजरा- १६८.२५ मिमी एकूण २६३४ मिमी, चंदगड- १०५.८३ मिमी एकूण २५१५.३३ मिमी.