पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संगमनेरमध्ये ट्रक चालकाकडून टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

अहमदनगरमध्ये ट्रकचालकाने टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावासा टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. टोल देण्यावरुन ट्रकचालक आणि टोल कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. या वादानंतर ट्रकचालकाने टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात टोल कर्मचारी जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अयोध्या प्रकरण : मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांची

टोल देण्यावरुन ट्रकचालक आणि टोल कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. या वादानंतर या ट्रकचालाकाने त्याच्या मित्रांना टोलनाक्यावर बोलून घेतले. त्यानंतर त्यांनी टोल कर्मचारी नवनाथ घुले यांच्यावर धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात नवनाथ घुले जखमी झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नवनाथ यांच्यावर संगमनेर शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद शहरात बिबट्या, जेरबंद करण्यासाठी वनविभाग 

चाकू हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. याप्रकरणी टोल कर्मचाऱ्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार ट्रक चालकाचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

धक्कादायक, पुण्यात सिंहगड रस्त्यावर आढळला तरुणीचा मृतदेह