पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्जाला आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

मृत जयंत शिरसाट

सततची नापिकी, त्यात यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने आणि त्यात कर्जाचा डोंगर यामुळे कंटाळलेल्या कावनई (जि. नाशिक) येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले.

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात? शक्य की अशक्य...

याबाबत अधिक वृत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील जयवंत पांडुरंग शिरसाट (वय ४६) या शेतकऱ्याने घोटीतील एका खासगी बँकेतून शेतीसाठी कर्ज घेतले होते. तसेच शेतीकरिता ट्रॅक्टरही कर्जाने घेतला होता. मात्र यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरसाट यांच्या भातपिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड करणे मुश्किल झाले होते. यामुळे व्यथित झालेल्या जयवंत शिरसाट यांनी आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

रामदास आठवलेंनी शिवसेनेचे टेन्शन घेऊ नये, संजय राऊतांचा टोला

दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना घोटीच्या रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, शासनाने त्यांच्या कुटुंबाना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी घोटीचे उपसरपंच संजय आरोटे यांनी केली आहे.