पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कसारा घाटात ट्रेलरने आठ वाहनांना उडवले, चौघे गंभीर

कसारा घाटात भीषण अपघात

नवीन कसारा घाटात नाशिकच्या दिशेहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरने जवळपास आठ वाहनांना धडक दिली.  सकाळी ९ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. यात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, शिवतीर्थावर शपथ घेणारः राऊत

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून मुंबईच्या दिशेने सळई लोड करुन जाणाऱ्या ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात मुंबई आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या छोट्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. यात ओमनीचा चुराडा झाला असून ४ कार २ ट्रक आणि एक छोटा हत्ती टेम्पो आणि गॅस टँकरचेही मोठे नुकसान झाले आहे. 

हे ५०-५० नवीन बिस्किट आहे का?, ओवेंसीचा उपरोधिक सवाल

या अपघातामुळे दोन तासांहून अधिककाळ वाहतूक कोंडी झाली होती. शहापूर आपत्ती व्यवस्थापन टिम आणि कसारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन तासांच्या प्रयत्नानंतर रस्ता वाहतूकीसाठी मोकळा केला.