पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'माफ करा साहेब! यावेळी तुमचे ऐकणार नाही'

आमदार जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतःहून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाणार आहेत.  या प्रकरणात अचानक शरद पवार यांचे नाव आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप पाहायला मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शुक्रवारी ईडीच्या कार्यालय परिसरात गर्दी करु नये, असे आवाहन ट्विटरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना केले आहे. 

येत्या शुक्रवारी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार - शरद पवार

मात्र,  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन पवारांनी केलेली आवाहन ऐकणार नसल्याचे म्हटले आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की,  माफ करा साहेब यावेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे ऐकणार नाही. महाराष्ट्र घडवताना तुमच्या वेदना आम्ही पाहिल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडाची शस्त्रक्रिया आणि पायाला झालेल्या दुखापतीनंतरही तुम्ही लढत आहात. हे सर्व तुम्ही आमच्यासाठी सोसले आहे. त्यामुळे उद्यासाठी माफ करा! असे ट्विट आव्हाडांनी केले आहे. 

शरद पवारांवरील कारवाईविरोधात परळीमध्ये जोरदार निदर्शने

कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करु नये, ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तिथे शांतता राखावी, असे आवाहन पवारांनी ट्विच्या माध्यमातून केले होते. दरम्यान उद्या शरद पवार यांनी कार्यालयात येऊ नये, असे ईडी कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचीही चर्चा रंगली होती. ईडीने बोलवल्यानंतर त्यांनी यावे, असेही वृत्त समोर येत होते. त्यामुळे उद्या नक्की शरद पवार आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.