पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंढरपूरमध्ये मठाधिपती होण्याच्या वादातून महाराजांची हत्या

पिंपरी बलात्कार आणि हत्या प्रकरण

पंढरपूरमध्ये कराडकर मठामध्ये महाराजांची हत्या करण्यात आली आहे. ह.भ.प.जयवंत महाराज पिसाळ यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मठाधिपती पदाच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. कराडकर मठाचे माजी मठाधिपती ह.भ.प बाजीराव कराडकर यांनी ही हत्या केली आहे. पंढरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

 

निर्भयाच्या दोषींना गय नाही, २२ जानेवारीला ७ वाजता होणार फाशी

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या अनिलनगर येथे कराडकर मठ आहे. या मठाच्या मठाधिपती जयवंत महाराज पिसाळ यांची नवनियुक्ती झाली होती. यावरुन बाजीराव कराडकर आणि जयवंत महाराज पिसाळ यांच्यात वाद झाला. या वादानंतर बाजीराव कराडकर यांनी जयवंत महाराज यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात जयवंत महाराज यांचा जागीच मृत्यू झाला. 

'फ्री काश्मीर'चे पोस्टर का झळकावले, मेहक प्रभूने केला खुलासा

या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर बाजीराव कराडकर यांना पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून मठाधिपती पदावरुन वाद सुरु होता. दोघे जणही एकादशी निमित्ताने सोमवारी पंढरपूर येथे आले होते. या घटनेमुळे वारकरी सांप्रदायात खळबळ उडाली आहे. 

कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेवेळी चेंगराचेंगरी; ३५ जण ठार