पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सैन्य दलाच्या त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणने दिला राजीनामा

चंदू चव्हाण

पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप भारतात आलेला लष्कराचा जवान चंदू चव्हाण याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे भारतीय सैन्य दलात एकच खळबळ उडाली आहे. भारतीय सैन्य दलातील त्रासाला कंटाळून चंदूने राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानातून सुटून भारतात आल्यापासून माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते. या सर्व त्रासाला कंटाळून मी राजीनामा देत असल्याचे चंदूने सांगितले आहे. 

राज्यात ७९८ उमेदवारांना धक्का; उमेदवारी अर्ज झाले नामंजुर

दरम्यान, चंदूने डीएम रेडिमेंट कमान अधिकारी यांच्याकडे पत्र पाठवून राजीनामा दिला आहे. या पत्रामध्ये त्याने असे म्हटले आहे की, 'पाकिस्तानातून सुटका झाल्यापासून सैन्य दलात मला वाईट वागणूक मिळत आहे. माझ्याकडे वारंवार वाईट नजरेने पाहिले जाते. सतत मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे मी दु:खी आणि अपमानित होत आहे. यामुळे मी सैन्यात नियमित येऊ शकत नाही.' असे चंदूने राजीनाम्यामध्ये म्हटले आहे. 

'गोडसे देशभक्त की मारेकरी?, मोदी-शहांनी भूमिका स्पष्ट करावी'